Sign In New user? Start here.

झगमग २०११

zagmag 2011

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

झगमग २०११

  पाहता पाहता २०११ हे वर्ष संपलंय. राजकारण, कला, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात अनेक चांगल्या आणि सोबतच वाईट गोष्टीही घडल्या. तशी सर्वीकडे चर्चा आहे की, २०१२ मध्ये जगबुडी होणार आहे. मात्र हे २०११ वर्ष पाहता याच वर्षात अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी अखेरचा निरोप घेतल्याने ते ते क्षेत्र बुडाल्याचं जाणवायला लागलंय. ह्याबरोबरच हे वर्ष तसं मनोरंजन क्रांतीचंही ठरलं. अनेक बिग बजेट आणि रेकॉर्ड बनवणारे हिंदी-मराठी चित्रपट याच वर्षात आले. खास करून या वर्षात मराठी सिनेइंडस्ट्रीने स्वत:कडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोबतच प्रसारमाध्यमांचाही बराच विकास या वर्षात झाला. आज मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. त्यातीलच एक महत्वाचं माध्यम म्हणजे मनोरंजन वेबसाईट्स. इंटरनेट हे संपूर्ण जगात झपाट्याने वाढणारं माध्यम आहे. त्यावर मनोरंजनाचा आनंद घेणारे प्रेक्षकही झपाट्याने वाढत आहेत. मात्र वेबसाईट तर अनेक असतात पण त्यांवर दिल्या जाणा-या कार्यक्रमांच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न आहेत. याचाच विचार करून मराठी मनोरंजनाचा दर्जेदार खजाना लोकांसाठी लेखी, ऑडिओ स्वरूपात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न महाराष्ट्राचं एन्टरटेंमेंट पोर्टल असलेल्या www.zagmag.net या वेबसाईटने केला आहे. २०११ या वर्षात झगमगने प्रेक्षकांना मनोरंजनाचा खजाना उपलब्ध करून दिला आहे. याच उपक्रमांचा हा धावता आढावा.

zagmag 2011

   झगमगने यावर्षाची सुरवात केली ती बृह्नमहाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाने(बीएमएम). बीएमएमच्या दर दोन वर्षांनी येणा-या या चार दिवसीय अधिवेशनाचे झगमग या पोर्टलवर ऑनलाईन प्रमोशन करण्यात आलं. ज्यात बीएमएम काय आहे? त्यात कोणते कलाकार सादरीकरण करणार आहेत? बीएमएमची भूमिका काय आहे? अशा अनेक गोष्टी झगमगच्या माध्यमातून जगभरातील लोकांना जाणून घेता आले. ही प्रेक्षकांनी प्रत्यक्ष वेबसाईटवर आणि न्युजलेटरच्या माध्यमातून जाणून घेतली. शिवाय या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देणारं zagmag application सुद्धा तयार करण्यात आलं.

zagmag 2011

   ह्या ग्लोबल इव्हेंटनंतर मराठी चित्रपट सृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांचे शो झगमग मराठी फिल्म फेस्टीव्हलमध्ये सातासमुद्रापार असलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले होते. या वर्षातील सर्वात गाजलेला ‘बालगंधर्व’ आणि ‘फक्त लढ म्हणा...!’ हे दोन चित्रपट दाखविण्यात आले. या फिल्म फेस्टीव्हलच्या उदघाटनासाठी प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि ‘बालगंधर्व’ चित्रपटाचे निर्माते नितीन देसाई स्वत: हजर होते. या फेस्टीव्हलला रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला.

zagmag 2011

   या यशस्वी घोडदौडेत आणखी एक मानाची गोष्ट झगमगवर करण्यात आली. ती म्हणजे मराठी चित्रपट्सृष्टीतील मानाच्या असलेल्या म्हैसकर मिफ्ता २०११ या लंडन येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्याचं ऑनलाईन प्रमोशन सोबत बोंबिलफ्रायडे या iphone app वर आणि वेबसाईटवर ऑनलाईन वोटींग सुद्धा करण्यात आलं. तब्बल सहा न्युजलेटरमधील विविध सेलिब्रिटींच्या मुलाखतीच्या माध्यमातून मिफ्ताचं स्वरूप देशातील आणि देशाबाहेरील हजारो लोकांपर्यंत पोहचवण्यात आलं. या पुरस्कारासाठी नामांकने मिळालेल्या कलाकार, दिग्दर्शक, लेखकांना मत देण्यासाठी आमच्या बोंबिलफ्रायडे या iphone app वर पहिल्यांदाच ऑनलाईन वोटींग करण्यात आलं. मराठी पुरस्कारासाठी ही अशाप्रकारे आयफोन वोटींग करण्यात आलेली पहिलीच घटना आहे. ही मानाची संधी मिफ्ताला झगमगच्या आणि बोंबिलफ्रायडे या वेबसाईटच्या माध्यमातून मिळाली.

zagmag 2011

   नुसतं चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील मनोरंजनच नाहीतर युवा रसिकांसाठी मुंबईतील प्रसिद्ध केसी कॉलेजच्या इंटर कॉलेज फेस्टीव्हलचंही ऑनलाईन प्रमोशन सुद्धा zagmag.net आणि bombilfryday.com या वेबसाईटवरून करण्यात आलं. ज्यात या कॉलेजच्या या इव्हेंटची संपूर्ण माहिती देण्यात आली होती. सोबत या इव्हेंटचे फोटोग्राफ्स सुद्धा देण्यात आले होते. या इव्हेंटसाठी बोंबिलफ्रायडे ने ऑनलाईन मिडिया पार्टनर म्हणून काम केलं. ह्या इव्हेंटला प्रसिद्धी देण्याचं कारण हेच आहे की, आमच्या दोन्ही वेबसाईटच्या माध्यमातून वेगवेगळ्या वयोगटातील रसिकांचं मनोरंजन व्हावं.

zagmag 2011

   प्रेक्षकांची संगीतविषयक आवड लक्षात घेऊन मुंबईत येथील दादर माटुंगा कल्चर सेंटर आणि मनसा या संगीत संस्थेतर्फ़े गेल्या चार वर्षांपासून घेण्यात असलेल्या संगीतकार संमेलन २०११ चे ऑनलाईन प्रमोशन सुद्धा झगमगवर करण्यात आले. फक्त मुंबईतीलच नाहीतर मुंबई बाहेरच्याही संगीतकारांना आणि संगीत रसिकांना संगीतातील बारकावे कळावे यासाठी संमेलनाचं प्रमोशन झगमगने करण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्याचं सादरीकरण करून संगीतकार संमेलनाची संपुर्ण माहिती, आयोजकांच्या मुलाखती, कलाकारांचे मनोगते आदी वेबसाईटवर देण्यात आलं होतं. मह्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकारांचे मनोगते हे ऑडिओ स्वरूपात देण्यात आले होते.

zagmag 2011

   अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा खजाना झगमग रसिकांसाठी घेऊन असतात. वरील वेगवेगळ्या उपक्रमांनंतर झगमगने कधी मागे वळून पाहिलेच नाही. प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन आणि माहिती देण्याचा जणू झगमगने निर्धारच केला आहे. पहिल्यांदाच झगमगवर मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार याने ‘कौशल कट्टा’ हा ब्लॉग लिहायला सुरवात केली. ज्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. दर आठवड्य़ाला कौशल त्याच्या कट्ट्यावर विविध लेखांच्या माध्यमातून त्याचे अनुभव लिहित असतो. ही खरंच वाचकांसाठी मेजवानीच म्हणावी लागेल.

zagmag 2011

   कौशल इनामदार याच्या कौशल कट्ट्याबरोबरच झगमगवर आणखी एका दर्जेदार उपक्रमाची सुरवात करण्यात आली ती म्हणजे पॉडकास्ट. या पॉडकास्टवर प्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या वेगवेगळ्या गप्पा ऎकायला मिळतात. दर आठवड्याला सुधीरजी रसिकांसाठी एक वेगळा लज्जतदार विषय घेऊन येत असतात. या सदरालाही श्रोत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

zagmag 2011

   या सर्वच दर्जेदार उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत असतांनाच www.zagmag.net या वेबसाईटवरून मराठी चित्रपटांचं ऑनलाईन प्रमोशन सुद्धा करण्यास सुरवात केली. ‘स्वराज्य...मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाचं ऑनलाईन प्रमोशन झगमगवरून करण्यात आलं. ज्यात या चित्रपटासंबंधी सर्व माहिती देण्यात आली होती. सोबतच सर्व कलाकारांच्या मुलाखतीही देण्यात आल्या होत्या. शिवाय प्रिमिअरचे फोटोग्राफ्स सुद्धा देण्यात आले होते.

zagmag 2011

   पुण्यातील मानाचा आणि दर्जेदार समजला जाणारा शास्त्रीत संगीताचा महोत्सव म्हणजे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव नुकताच पार पडला. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज गायक-वादक यात संमेलनात गेली ५९ वर्ष आपली कला सादर करीत आहेत. हा मात्र हा महोत्सव पुण्यात होत असल्याने या महोत्सवात काय झालं? कुणी सादरीकरण केलं? कुठल्या गायकाने कोणता राग सादर केला? या सर्वच घडामोडींची माहिती सातासमुद्रापार वसलेल्या संगीत रसिकालाही कळावं, यासाठी झगमगवर या महोत्सवाचा वॄत्तांत देण्यात आला. सोबतच या महोत्सवाची बोलकी छायाचित्रेही देण्यात आली आहे. ज्या लोकांना या कार्यक्रमाला जाता आले नाही. अशांना निदान या लेखांच्या माध्यमातून या महोत्सवाचा आनंद घेता आला.

   झगमग आणि बॊंबिलफ्रायडे या वेबसाईटवरील अशा एकशे एक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या मागे एकच उद्देश असतो, तो म्हणजे सर्वच रसिक प्रेक्षकांना मनोरंजनाचा दर्जेदार खजाना उपलब्ध करून देणं. सोबतच मराठी सिनेविश्वात तयार हॊणा-या नवनवीन कलाकॄती सर्वसामान्य लोकांपर्यंत पुरवणं हाच आहे. या २०११ वर्षात तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त मनोरंजन पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यावर्षाप्रमाणे येत्या २०१२ वर्षातही आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुमच्या प्रतिसादाची आम्हास अपेक्षा आहे.

   अमित इंगोले