Sign In New user? Start here.

सातासमुद्रापार असलेल्या मराठी प्रेक्षकांना मायबोली भाषेतील मराठी चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून २०११ मध्ये घेण्य़ात आलेल्या झगमग फिल्म फेस्टीव्हलचा...

zagmag film festival start

 
बालगंधर्वांची गाथा सातासमुद्रापार
 
 
 
zagmag

सातासमुद्रापार असलेल्या मराठी प्रेक्षकांना मायबोली भाषेतील मराठी चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून २०११ मध्ये घेण्य़ात आलेल्या झगमग फिल्म फेस्टीव्हलचा पहिला टप्पा २० ऑगस्ट रोजी पार पडला असून या फेस्टीव्हलचे दुसरे पुष्प येत्या २८ ऑगस्टला नॉर्थ कॅरोलिना येथील Galaxy Cinemas थिएटरमध्ये गुंफल्या जाणार आहे. कॅनडातील टोरांटो येथे झालेल्या पहिल्या सत्रात सुबोध भावे याच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अतिशय जोरदार प्रतिसाद दिला. आता २८ तारखेलाही प्रेक्षक असाच प्रतिसाद देतील अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सद्या अनेक वेगळ्या विषयांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात गाजत आहेत, त्यांची चर्चा होत आहे. २०११ या सालातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे संगीत नाटकांचे सम्राट `बालगंधर्व' यांच्या जीवनावर आधारीत ‘बालगंधर्व’ हा चित्रपट प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी निर्मित केला आहे. २० ऑगस्टला झालेल्या फेस्टीव्हलमध्ये त्यांच्या उपस्थितीत बालगंधर्वचा शो दाखविण्यात आला.

 

 
Untitled Document