Sign In New user? Start here.

अवंती पुंडे धर्माधिकारी

 
जीवनातला स्त्री रंग -

अवंती पुंडे-धर्माधिकारी
वेब / ग्राफिक डिझायनर
सातेरी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रा.लि.

 

Art Gallery

 

आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय लक्षणीय कामगिरी करत आहेत. घराचा उंबरठा ओलांडून आपल्या विविध गुणांनी घराण्याचे नाव उंचावत आहेत. चूल आणि मूल ही जबाबदारी अतिशय हिमतीने पेलुन महिला बाहेरच्या जगातील उत्तुंग कामगिरी करताना दिसतात.

अशा महिलांचे मला लहानपणापासुनच कुतुहल होते. तसच लहानपणापासुनच माझी आई अशाच रितीने घराची जबाबदारी अतिशय खंबीरपणे पेलून आम्हा बहिणीचे संगोपन करुन माझ्या वडिलांना धंद्यात मदत करत असे. सोबतच कलेची पण जोपासना करत असे. सतत कामात राहणे, कला गुणांना प्रोत्साहन देणे अशा संस्कारातुनच मी घडत गेले. कलेशी नाते जोडत मोठी होत असताना मला वेब डिझाईन हे क्षेत्र अतिशय भावले.

हातात ब्रश धरुन चित्र साकारण्या बरोबरच कम्प्युटर आर्ट ह्या क्षेत्रात काम करायचे मी ठरवले. सी-डॅक मधुन कोर्स केल्यावर तिथेच न थांबता स्वत:ही विविध विषयाचे शिक्षण घेणे मी चालूच ठेवले. पंडित भिमसेन जोशी, सलील कुलकर्णी, विजय घाटे, सवाई गंधर्व या दिग्गज लोकांची वेबसाईट डिझाईन करायचे भाग्य मला लाभले. तसेच सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा अनुभव ही मी घेत होते. जॉब आणि फ्रिलासिंग करत या क्षेत्रात मी अनुभव संपादन करत होते. चित्रकलेशी ही मैत्री वाढत होती त्यातुनच मी पंडीतजीचं चित्र रेखाटून त्यांची दाद मिळवली.

लग्नानतंरही मी जॉब आणि घर खंबीरपणे सांभाळत आहे. अडचणी तर येणारच, पण अडचणीवर मात करुन ‘जो पुढे जातो, तोच स्पर्धेत टिकतो’. या धोरणासोबत मी आज माझ्या मुलीला सांभाळून कार्यरत आहे. चित्रकला, डिझाईन या क्षेत्रात मला खबीरपणे उभं करण्यात माझ्या गुरुजनांचा, आईवडीलांचा मोलाचा वाटा आहे.

आज मला मराठी तारेतारकांच्या झगमग विश्वात काम करायला मिळते. हे सर्व करताना एकवीसाव्या शतकातील स्त्री म्हणुन मला माझ्या मुलीचा फार अभिमान वाटतो आणि केवळ तिच्या सहकार्यामुळेच मी मला थोडया प्रमाणात सिद्ध करु शकत आहे. तीला टाईम मॅनेजमेन्ट, मल्टीटास्कीगं मध्ये निष्णात करुन सुजाण नागरीक बनवायचे माझे स्वप्न आहे.

महिलादिनाबद्द्दल बोलायला मी व्यक्ती म्हणुन खुप लहान आहे, परंतु तरी मला भावलेलं पु.ल.देशपाडे याचें एक गुज सागंते, ‘पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण! कलेशी मैत्री जमवा, पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण, कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायच हे सांगुन जाईल’. महिला दिनाच्या शुभेच्छा!!!

अवंती पुंडे-धर्माधिकारी