Sign In New user? Start here.

दिपाली कुटे

 
आजही शोध या प्रश्नांचा....?????? -

दिपाली कुटे
सॉफ्टवेअर इंजिनिअर
सातेरी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रा.लि.

‘स्त्री’ या समाजाचा, पुरूषाचा अविभाज्य घटक...! मुलगी, बहिण, नात, पत्नी अशा भूमिका ती सतत निभावत असते. जरी पूर्वीपेक्षा आज स्त्रिला स्वातंत्र्य मिळालंय असं बोललं जात असलं तरी प्रत्यक्षात खरंच स्त्री स्वतंत्र आहे का? याचा विचार समाजातील प्रत्येकाने करायला हवा. कारण आजही स्त्रियांवर अनेक अत्याचार सर्रास केले जातात. समाजातील चार बायका बिनधास्तपणे वागतात म्हणजे संपूर्णं स्त्रिया स्वतंत्र झाल्यात असं नाहीये. मग असं नसतांनाही आपण का महिला दिन साजरा करतो. हा माझा सर्वांना प्रश्न आहे.

केवळ आजचा दिवस जागतीक महिला दिन म्हणून मी मला काय वाटते हे व्यक्त करणं, खरचं किती योग्य आहे? आज मी शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली, आवडीचे क्षेत्र, आवडीचे शिक्षण सर्व काही मागण्या आधीच मिळाले. मात्र या दिवसाच्या निमित्ताने माझ्याबद्दल काही बोलावं असं काही नाहीये. पण माझे काही प्रश्न ज्याची उत्तरं मिळाली तर खरंच मला चांगलं वाटेल. आज खरंतर महिला दिवस साजरा करण्याची गरज काय? स्त्री पुरुष समानता जर आपण मानतो, तर जातीचे भेद आपण का विसरु शकत नाही? समानता हवीच असेल तर संपूर्ण असावी अन्यथा एखादा दिवस केवळ आपला म्हणून साजरा करण्यात अर्थ काय? आज या मिळालेल्या स्वातंत्र्यात किती जणी चौकटी बाहेर जगतात. काही अपवाद वगळता कोणीही नाही. आजही वेगवेगळे बंधने आहेतच. मग ही मानसिकता केवळ बदलणार आणि केवळ महीला सशक्तिकरण म्हणजे काय? मला केवळ मी एक स्त्री अशी ओळख नको तर एक माणूस आणि समाजाचा एक स्वतंत्र घटक अशी ओळख हवी आहे. तसेच स्त्रियांना मिळालेलं स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकही आपल्याला कळायला हवा. आणि हो स्वातंत्र्य आणि मनमानी यातला भेद आजच्या स्त्री समजावून घ्यावा असं मला खरचं वाटतं. कारण एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष असं जग नसतंच, तर ते समानतेने आणि समजूतीने घडतं. हा केवळ माझा विचार मी मांडला, यावर निदान एकदा तरी सर्वांनी विचार करावा आणि माझ्या या प्रश्नांचे उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही करावा.

दिपाली कुटे