Sign In New user? Start here.

वैशाली नांदनीकर

 
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी... -

वैशाली नांदणीकर
प्रोजेक्ट मॅनेजर
सातेरी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रा.लि.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी...- किती खरे आहेत हे शब्द? स्त्रियांना आईपणाची जी देणगी ईश्वराने दिली आहे त्यामुळे त्यांचे सामर्थ्य अतुलनीय आहे. त्या दुस-यांना सहजपणे समजून घेऊ शकतात, क्षमाशिल वॄत्ती, कुशलपणे अनेक गोष्टीत एकाच वेळेला लक्ष देणे अशी कितीतरी उदाहरणे देता येईल. आपल्या पाल्याची हरेकप्रकारे काळजी घेतांना त्यांना कधी चुचकरून तर कधी रागावून त्यांना वर आणणे कुठल्याही आईला शिकवावे लागत नाही. कौसल्या, गांधारी, शकुंतला, गार्गी, मैत्रेयी, सावित्रीबाई, मदर तेरेसा अशा विविध स्त्रियांचे वेगवेगळे पैलू पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की, स्त्रियांना समजणे किती अवघड आहे आणि तिची ती वेगवेगळी रूपे लोभस असतात.

आजच्या स्त्रियांना तर काम आणि घर अशा दोन्ही आघाड्या सांभाळाव्या लागतात. त्यामध्ये ओढाताण नक्कीच होते, पण स्त्रियांमधील नैसर्गिक गुणांमुळे त्यांना हे टाईम मॅनेजमेंट जमते. आज मी एक स्त्री म्हणून माझ्या भूतकाळाकडे वळून पाहताना जाणवते की, खुप काही शिकले या प्रवासात आणि अजूनही खुप काही शिकायचे बाकी आहे. पण महत्त्त्वाचे हेच आहे की माणसाने शिकणे कधीच सोडू नये, सतत शिकतच रहावे.

माझा स्वत:शी असलेला संवाद मला पुढे शिकायची नवी उमेद देतो, आपण केलेल्या चुक बरोबर गोष्टींचे विश्लेषण करणे आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. आपले काम आणि घर यामध्ये बॅलन्स राखायला लागतो, त्यासाठी कामाची निटपणे आखणी करावी लागते आणि वेळेचे भान ठेवावे लागते. संध्याकाळी मुलांबरोबर खेळल्यामुळे मला दुस-या दिवशीसाठी परत उत्साह येतो आणि मी नव्या स्फूर्तीने आणि उत्साहाने सकाळी ऑफिसमध्ये येते.

अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि मला विश्वास वाटतो की, सगळ्या गोष्टींचा समन्वय साधून मी भविष्यात आणखी चांगलं काम करेन...

वैशाली नांदणीकर