Sign In New user? Start here.

भाव मनाचे

 
 

साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. दगडू लोमटे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील सहवासात आलेल्या लोकप्रिय व्यक्तींना त्यांच्या मनातील भावना, त्यांच्याविषयीचे अनुभव 'न पाठवलेल्या पत्र' व्दारे कळवले आहे. ती पत्रे आपणास सादर आहेत.

 

ग्रेस

पुण्यात होतो. आणि तेही एक दिवसा साठी. काम आठवत नाही पण होतो. पुण्यात असल्यावर नाटक, संगीत, अन्य काय काय मैफिल आहेत हे पाहण्याचा नाद.त्या साठी सर्वच वृतपत्रे चाळणे हा पुण्यात उतरलो कि, सकाळ सकाळचा उद्योग..

 
 

बाबा उर्फ राज दत्त

पत्र लिहिण्याचे कारण असे की, गझलसम्राट भीमराव पांचाळे यांच्यामुळे जे अनेक सहृदयी भेटले, त्यांना आठवत होतो. ज्यांना जवळून पाहण्याचा, जाणून घेण्याचा योग आला त्यात तुमचे नाव अग्रक्रमाने येते. साधी राहणी आणि उच्च विचार, व कामही तसेच. आजच्या जमान्यातले लोक ज्यांना चित्रपट..

 
 

पदमश्री पद्मजा फेणानी-जोगळेकर

पत्रास कारण की, खूप दिवस झाले अशात संवाद नाही. अधून मधून फेसबुकवर जुजबी बोलणे होते, खरं म्हणजे कॉमेंटस होतात. पण सविस्तर बोलायला तसा एवढा वेळ मिळत नाही. तुम्ही कुठे दौऱ्यावर असलात की सुनीलकडून अपडेट्स मिळतात.

 
 

गझलनवाझ श्री भीमरावजी पांचाळे

तुमचे गझल गायक म्हणून पहिल्यांदा नाव ऐकले व गझलही प्रथमच ऐकली ती १९९५ साली. माझ्या एका मित्राला गझल ऐकण्याचे वेड होते. पण ते वेड उर्दू किंवा हिंदी गझलांचे. एक दिवस त्याची अचानक भेट झाली तर त्याच्या हातात ३ ध्वनीफिती होत्या.