Sign In New user? Start here.

मराठी गझल संमेलन २०१२

नुकतंच गोव्याला सहावं अखिल भारतीय मराठी गजल संमेलन १४ आणि १५ जानेवारीला पार पडल...

  नुकतंच गोव्याला सहावं अखिल भारतीय मराठी गजल संमेलन १४ आणि १५ जानेवारीला पार पडलं. महाराष्ट्रातील आणि गोव्यातील गजलकार-रसिकांनी संमेलनाला भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्यांदाच हे संमेलन महाराष्ट्राबाहेर घेण्यात आलं. त्यामुळे आधीच्या संमेलनांप्रमाणे याही संमेलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. गोवा कला अकादमी आणि गोमंतक मराठी मंडळाच्या सहकार्याने हे संमेलन गजल सागर प्रतिष्ठानने घेतलं. झगमग डॉट नेट या वेबसाईटवरून हे संमेलन सातासमुद्रापार पोहचवण्यासाठी वेबसाईटवर या संमेलनाचं एक स्वतंत्र पेज तयार केलं. ज्यात गजलकार, आयोजक, गजल गायक यांच्या ऑडिओ मुलाखती देण्यात आल्या आहेत. शिवाय या दोन दिवसीय संमेलनाचा लेखी आढावाही देण्यात आला आहे. तसेच या संमेलनाचा आनंद या संमेलनाला येऊ न शकलेल्या रसिकांनाही घेता यावा यासाठी या संमेलनातील सर्वच सत्रांचा ऑडिओ आम्ही वेबसाईटवर लवकरच देत आहोत. ज्यात वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवास, गजल मुशायरे, गजल मैफली ऎकण्याची संधी मिळणार आहे.

   अमित इंगोले

Other Global Activities link